जुन्नर :-

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन ” चारण सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ” ज्ञानेश्वरनगर, कोरडेमळा (बोरी बुद्रुक) ह्या गणपती मंडळाने ६४ वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव व गणेशोत्सवाच्या निमित्ताने या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

जुन्नर तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी विविध उपक्रम हाती घेतले असताना या मंडळाने अभिनव असा सामाजिक रक्तदान शिबीराचा उपक्रम हाती घेतला आहे.या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळत असून या शिबिराचे उद्घाटन शिवनेरी भूषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

बोरी बुद्रुकच्या सरपंच वैशाली जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ठकसेन कोरडे, भगवंत कोरडे, काशिनाथ कोरडे, युवराज कोरडे, आदी मान्यवरांनी या शिबिराला भेट दिली असून संजीवनी ब्लड बँक यांनी विशेष सहकार्य केले आहे,अशी माहिती विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष व चारण सेवा मंडळाचे संचालक लक्ष्मणराव कोरडे यांनी दिली आहे.रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिनिधी:- राजेंद्र भोर ,बोरी

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!