राजगुरुनगर :- 

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा २३१ वी जयंती सोहळा  ७ सप्टेंबर रोजी भिवडी ता.पुरंदर जि. पुणे येथे ठिक १० वाजता संपन्न होणार असून, त्या कार्यक्रमा निमित्ताने मु.पो.राजगुरुनगर ता.खेड जिल्हा पुणे येथे सर्व शासकीय कार्यालयात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात यावी म्हणुन मा.श्री दौलत नाना शितोळे साहेब संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना व मा.श्री.रामदास आबा धनवटे साहेब अध्यक्ष कोअर कमिटी तसेच मा.श्री.रोहीदास दादा मदने युवक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग खेड, तहसीलदार साहेब खेड तालुका,बी. डी. ओ.साहेब खेड,गट शिक्षणाधिकारी साहेब खेड तालुका यांना आज निवेदन देण्यात आले

यावेळी जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा सचिव मा.श्री.मनोहर गोरगल्ले, जय मल्हार क्रांती संघटनेचे मार्गदर्शक मा.श्री.आप्पासाहेब भंडलकर, लहुजी सेना तालुका अध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब वायदंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रतिनिधी
फैयाज इनामदार

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!