जुन्नर :-
नारायणगाव-बेल्हा मार्गावरील
जांबुतफाटा ते बेल्हे या प्रजिमा क्रमांक ८ रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु वडगाव कांदळी व साळवाडी (कमलामाता नगर दरम्यान) दोन्ही गावातील शेतकऱ्यांचा सीमेवरून वाद सुरू आहे.याबाबतचा वाद हा दिवाणी कोर्टात सुरू आहे. जांबुतफाटा येथून रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना भोरवाडी पुढील ते कमलामाता नगर येथे शेतकऱ्यांच्या हरकतीमुळे काम बंद ठेवून पुढचे काम सुरू करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस संरक्षणात या कामाला सुरुवात केली असून याबाबत माहिती घेतली असता हा वाद या दोन्ही गावांच्या सीमेबाबत असल्यामुळे पोलीस संरक्षणात हे काम सुरुवात केल्याचे कळत आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता डी.पी. रायकर, कनिष्ठ अभियंता डी.पी. बागले, स्थापत्य सहाय्यक अभियंता एस्.एस्. माने हे अधिकारी उपस्थित होते. नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर होते.
प्रतिनिधी: राजेंद्र भोर,साळवाडी
