सोलापूर :-

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आज सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरे झाले. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा ”नवरस” हा मुख्य विषय होता. शृंगार, वीर, हास्य, करुणा, भय, शांत, रौद्र, बिभत्स या रसांनी परिपूर्ण असे नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले. रामायण व महाभारत या संस्कारक्षम नृत्य नाटिका तसेच इतर अनेक रंगतदार कार्यक्रमाने स्नेहसंमेलन आकर्षपूर्ण झाले.

वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी मा.सौ. मीनाक्षी वाकडे हे होते व अध्यक्षपदी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य मा.डॉ. राजशेखर येळीकर हे होते. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री योगेश राऊत, पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार, माजी मुख्याध्यापिका सौ अंजली तिवारी, पालक शिक्षक संघाचे प्रमुख मा श्री अमोल खानापुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ अंजली खानापुरे, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व शिरसीकर व प्रज्ञा चव्हाण उपस्थित होते.


प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करीत अभ्यासाबरोबर इतर कलागुणांनाही वाव द्यावा असे विशेषत्वाने नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थी कु. सौम्या बसूदे, अपूर्वा कंदीकटला, श्रीराम भरत व आदित्य कलागते यांनी केले.आदर्श शिक्षिका म्हणून सौ.नीता तमशेट्टी व सौ. विजया बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श क्रीडाशिक्षक म्हणून श्री पवन भोसले व आदर्श प्रशासकीय कामासाठी श्री शिवराज बिराजदार यांचा सन्मान करण्यात आला.

 

साक्षी बिराजदार, सौंदर्या कलशेट्टी व आदर्श विद्यार्थी म्हणून भरत श्रीराम यांची निवड करण्यात आली.पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले. आभार प्रदर्शन कु. खूशी दुबे या विद्यार्थीने केले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!