आळे :
ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे,संतवाडी,कोळवाडी संचलित ,मा.श्री बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर श्री संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर, संतवाडी,आळे या ठिकाणी दि.५ जानेवारी २०२४ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ शुक्रवार ,दि. ५जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे माजी पंचायत समिती सदस्य व वसंतराव नाईक पतसंस्थेचे चेअरमन मा. नेताजी दादा डोके यांच्या हस्ते व .पंचायत समिती जुन्नर चे माजी उपसभापती मा. जी. एल गुंजाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
” युवकांनी समाजाच्या गरजा ओळखाव्यात व त्या पूर्ण करण्याकरिता स्वयंस्फूर्तीने पुढे यावे “ असे प्रतिपादन मा. नेताजी दादा डोके यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष,मा.प्रदीप गुंजाळ, संतवाडी गावचे सरपंच मा. नवनाथ निमसे, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप निमसे, शरदचंद्र पतसंस्थेचे संस्थापक व विद्या विकास मंदिर राजुरी चे प्राचार्य मा. जी. के औटी सर, पत्रकार सहदेव पाडेकर, व शुभम थोरात (हिंदवी न्यूज) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण जाधव महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व शिबिरार्थी विद्यार्थी इ.उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख कार्यक्रम अधिकारी, डॉ.जयसिंग गाडेकर यांनी केले, पाहुण्यांचा स्वागत व सत्कार समारंभ प्राचार्य डॉ.प्रवीण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे उदघाटक मा. नेताजी दादा डोके तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जी.एल गुंजाळ, तसेच महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजाळ यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरविंद कुटे यांनी केले तर आभार प्रा.विकास पुंडे यांनी मानले.