बोरी :
जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी,माध्यमिक महिला शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३/२४ याशैक्षणिक वर्षाचा तालुकास्तरीय गुणवंत लिपीक पुरस्कार बोरी खुर्द येथीलगुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेचे कनिष्ठ लिपीक श्री.सुरेश दत्ताराम शेळके यांना नुकताच जुन्नरचे युवा आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यानिमित्त सर्वोन्नती मंडळ, बोरी खुर्द तसेच लोकनेते पतसंस्था बोरी खुर्द यांच्या वतीने सुरेश शेळके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण काळे,सचिव नरहरी शिंदे,लोकनेते पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव काळें,उपाध्यक्ष दिनकर काळे,गावचे पोलीस पाटील रामदास काळे,माजी उपसरपंच संतोष काळे,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे,प्रशालेचे माजी विद्यार्थी केशव काळे संतोष काळे,किसन काळे,किरण शेटे,सुभाष शिंदे,योगेश काळे, सुधीर बेल्हेकर आदी मान्यवर तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी- वृंद उपस्थित होते.
वैभव काळे यांनी आपल्या मनोगतात शेळके सर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व त्यांचा गावातील सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो याचा उल्लेख केला.लिपीक हा शालेय व्यवस्थापनात विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांना जोडणारा दुवा असतो हे काम ते प्रामाणिकपणे करतात असे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय धायबर सर यांनी तर आभार श्री पटेल सर यांनी मानले.
प्रतिनिधी – राजेंद्र भोर