आळेफाटा (वार्ताहर) :
जुन्नर तालुक्यातील मुख्यमंत्री सहायता निधी पॅनल वर असलेल्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी अल्पवधीत जवळपास 50 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य प्रदान करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. सदर अर्थसहाय्य मिळणेकामी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या जनउद्धारार्थ पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ एस डी मंगेश चिवटे, कक्षप्रमुख रामहरी राऊत, सह कक्षप्रमुख माऊली घुळगुंडे, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना वैद्यकीय कक्ष जुन्नर समन्व्यक संपर्क प्रमुख अक्षय कुटे यांच्या विशेष प्रयत्नांनातून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना वैद्यकीय अर्थ सहाय्यता निधीचा फायदा मिळवून दिला. अक्षय कुटे यांनी या कामी अनमोल सहकार्य केलेबद्दल मंत्रालयातील सहायता निधी कक्षाचे मुख्य अधिकारी मंगेश चिवटे तसेच स्वरूप काकडे, अरविंद मांडवकर, राहुल भालेराव, रवींद्र ननावरे आदींचे मनःपूर्वक आभार मानले. मुख्यमंत्री सहायता निधी मिळालेल्या सर्व रुग्णांनी, त्यांच्या नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे मनापासून आभार मानले. अक्षय कुटे यांना त्यांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. अधिकाधिक गरजू रुग्णांना फायदा मिळावा याकामी मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज भरताना काही अडचण निर्माण झाल्यास शिवसेना वैद्यकीय कक्ष जुन्नर तालुका समन्व्यक अक्षय कुटे यांच्या 9665023550 ह्या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचे जाहीर आवाहन केले.
