आळे :
दिवाळी सण निमित्त अथर्व मंगल कार्यालय आळे येथे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना दिवाळीचा भेटवस्तूंची वाटप जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा पत्नी गौरी बेनके यांच्या हस्ते दिवाळी भेट वस्तू ज्यामध्ये साखर, रवा , मैदा , पोहे , बेसनपीठ ,तेल ,उटणे इत्यादी पदार्थचे वाटप करण्यात आले. आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर्सच्या चालू असणाऱ्या संपला आमदार साहेबांचा पाठिंबा आहे . त्याचप्रमाणे कोरोना काळात आशा वर्कर्सने जे काम केले ते कौतूकास्पद आहे . आरोग्य खात्यामध्ये कोणतीही अडचण आल्यास हक्काने सांगा आमदार साहेब आणि बेनके परिवार सदैव आपल्या सोबत आहे असे गौरी बेनके यांनी त्यांचा भाषणात सांगितले.
या कार्यक्रमास गटप्रवर्तक सोनल आल्हाट ,आशा वर्कर स्नेहल खंडागळे , नीलम कुटे ,आरती वाळुंज, नरगिझ मोमीन , सोनाली गडकरी , अनिता बुद्धिवंत , अर्चना लोंढे , छाया पिंगळे, चमेली सिंग , शोभा सिंग ,मधू तोमर , प्रणाली घाडगे , रुबिना मोमीन , लता गाढवे, शकुंतला डावखर , आरती जोरी ,अर्चना विधाटे , रागिणी धोंगडे त्याचप्रमाणे पिंपळवंडी , राजुरी ,बेल्हे येथील ही आशावर्कर्स व अंगणवाडी सेविका या कार्यक्रमास उपस्तित होत्या .