सोलापूर :

दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापुरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश सह इतर राज्यातून हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत जात असतात या चालत जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत माजी अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे व द्वितीय उपाध्यक्ष राजेश परसगोंड यांच्या सौजन्याने व स्वामी क्लिनिकचे डॉ. एम. एस. स्वामी व त्यांच्या टीमच्या सहकार्याने आणि लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटीच्या च्या माध्यमातून मोफत महाआरोग्य सेवा केंद्राचे उद्घाटन विभागीय सभापती MJF ला. राजेंद्रजी शहा कासवा यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे विभागीय सभापती राजेंद्रजी शहा यांचा व स्वामी क्लिनिकचे डॉक्टर एम एस स्वामी यांचा शाल व श्रीफळ देऊन आयोजक सागर पुकाळे व राजेश परसगोंड यांनी लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजेंद्र शहा यांनी लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्वीन सिटीच्या या अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिले. या शिबिरामध्ये रक्तदाब चेक अप, थकवा, पाय दुखी, किरकोळ आजार याची तपासणी करून गरजेनुसार गोळ्या, औषध, मलम, इंजेक्शन इत्यादी मोफत देण्यात आले. यावेळी अध्यक्ष इंजि. रविकिरण वायचळ खजिनदार प्रभाकर जवळकर, राजिव देसाई, नागेश बुगडे, नंदिनी जाधव,सोमशेखर भोगडे सागर पुकाळे, राजेश परसगोंड, शिवराज टेंगळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!