ओतुर (ता.जुन्नर) :
ओतुर येथील ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयातील एका शिक्षकाने शाळकरी अल्पवयीन मुलीला सोशल मिडीया व्हाॅटसअॅप अश्लील मेसेज केले होते .या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य काय॔कारी अधिकारी यांनी संबंधित शिक्षकावर तत्काळ कारवाई करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना तत्काळ सादर करण्याचे आदेश संबंधित शाळा प्रशासनास देण्यात आले आहेत.हे पत्र ग्रामविकास मंडळ ओतुरचे अध्यक्ष यांना प्राप्त झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.या अश्लील चॅटिंग मेसेज प्रकरणातील विद्यार्थीनी ही अल्पवयीन असल्याचे दिसुन येत असल्याने बाल न्याय हक्क (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015,सुधारित अधिनियम 2021 लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण कायदा,यानुसार तत्काळ काय॔वाही होणे अपेक्षित असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे .या पत्रामुळे संबंधित शिक्षकावर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे .उपोषणकर्ते हे जेष्ठ समाजसेवक असुन त्यांचा आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस चालु आहे.
फैय्याज इनामदार
प्रतिनिधी
