अहमदनगर :
साडेपाच वाजता पहिली आरती त्रिभुवनवाडीला केली मग त्यानंतर चांदगाव, अकोला ,पालवेवाडी, जांभळी ,फुंदे,टाकळी,ढाकणवाडी ,मालेवाडी या सर्व आरत्या करत करत शेवटची आरती रात्री अकरा वाजता पार पडली रात्रीच्या अकरा वाजले तरी गणेश मंडळातील सदस्य गावातील ग्रामस्थ महिला भगिनी त्या ठिकाणी माझी वाट पाहत होते. प्रत्येक ठिकाणी सर्व गणेश मंडळातील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले घोषणाही दिल्या.. हे सर्व प्रेम पाहून मी भारावून गेलो.. जनतेचे प्रेम हीच माझी ताकद आहे आणि हेच माझं धन आहे.सर्वांशी संवादही साधला सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.. येत्या काळात या मायबाप जनतेसाठी संघर्ष करायचा आहे. यांच्या हातातला कोयता खाली ठेवायचा आहे.या माझ्या तरुण मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मला संघर्ष करायचा आहे. मी काय कुणी आमदार खासदाराचा पोरगा नाही मी एक सर्वसामान्य माणूस आहे पण आपल्या माणसांसाठी काम करण्याची इच्छा आहे आपल्या लोकांचे चांगलं झालं पाहिजे हीच माझ्या मनात इच्छा आहे. आणि यासाठीच मी दिवस रात्र फिरत आहे आणि अजूनही खूप संघर्ष करणार आहे येत्या काळात आपल्या सर्वांच्या घरोघरी येणार आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन येणाऱ्या निवडणुकीला मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सामोरे जाणार आहे.याच पद्धतीने आपण सर्वांनी मला ताकद देत राहावे हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो.माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला लोक एवढं प्रेम देत आहे यापेक्षा मोठं काय असू शकतं.. लोकांचा माझ्यावर असलेला हा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. अशी भावनिक साद त्यांनी लोकांना या वेळी घातली
मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
