आळेफाटा (वार्ताहर) :
जगदंबा नवरात्र उत्सव समिती आळेफाटा यांच्या वतीने जगदंबा माताच्या मनमोहक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 2019 पासूनची नवरात्र उत्सवाची अखंड परंपरा दि 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनाच्या मुहूर्तावर आळेफाटा मार्केटयार्ड समोर असलेल्या साई पार्क येथे समोरील मोकळ्या मैदानात उत्कृष्ट आरास करीत पाचव्या वर्षात पदार्पण केले.मंडळाचे मार्गदर्शक सोपान कदम, अनंत गटकळ, विष्णू सोनवणे, वसंत मते, अरविंद पोटे, उदयोजक अशोक औटी, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले.
मंडळाचे धडाडीचे सभासद मारुती पाडेकर, बबलू भंडलकर, सत्यवान बोऱ्हाडे, प्रदीप चौगुले, स्वप्निल मते, अरुण औटी, संतोष नवले, सागर लामखडे, विजय कुऱ्हाडे, ऋषिकेश कुऱ्हाडे, सम्राट कुऱ्हाडे, सूरज कुऱ्हाडे, विजय कदम, निलेश शिंदे, संदिप गाडगे, गणेश पांचाळ, सौरभ औटी, सौरभ चौगुले, भोलाभाई प्रजापती, चंद्रकांत वाघमारे, राजू रोकडे, भगवान कुंजीर, विकास औटी, आयुष रोकडे, समर्थ पाडेकर, सार्थक खिलारी, विनायक औटी, अमर सहाणे, हरिदास फलके, साथी आदी सभासदांच्या सक्रिय सहभागात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले. नऊ दिवस दांडिया रसिकांसाठी दांडिया महोत्सव याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांस दैनंदिन बक्षीस देण्यात येणार असून महिला गटात प्रथम क्रमांक यांस रामकृष्ण हरी वस्त्र भांडार तर्फे पैठणी, द्वितीय क्रमांक यांस सचिन ज्वेलर्स तर्फे चांदीची फ्रेम, तृतीय क्रमांक यांस माऊली ज्वेलर्स सुयोग पाडेकर यांच्या तर्फे सोन्याची नथ, चतुर्थ क्रमांक व पंचम क्रमांक यांस मयूर कलेक्शन तर्फे बॅग, सहावा क्रमांक यांस हॉटेल राजेशाही संपत जाधव यांच्या तर्फे भिंतीवरचे घड्याळ देण्यात येणार आहे. पुरुष गटात प्रथम व द्वितीय क्रमांक यांस अनुक्रमे देवीची फोटो फ्रेम व देवीची मूर्ती भेट शिवनेरी हार्डवेअर चे मारुती पाडेकर यांच्या तर्फे देण्यात येणार आहे तर तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक यांस मयूर कलेक्शन तर्फे भेट देण्यात येणार आहे.
शनिवार दि 21ऑक्टोबर रोजी महिला वर्गासाठी अभय वारुळे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमास प्रथम क्रमांक यांस मानाची पैठणी व सोन्याची नथ वरदविनायक बिल्डर्स व डेव्हलपर्स आणि कुलस्वामिनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकास रोकडेश्वर ज्वेलर्स यांच्यातर्फे गोल्ड प्लेटेड देवीची मूर्ती बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांक सत्यम कलेक्शन आळेफाटा यांच्या तर्फे पैठणी देण्यात येणार आहे. या बरोबरीनेच जवळपास 18 विजेत्यांना विविध आकर्षक बक्षीस भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आलेला आहे. यामधील प्रथम क्रमांकास माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके व माजी जिल्हा परिषद सदस्य नयनाताई डोके यांच्या माध्यमातून फ्रिज, द्वितीय क्रमांक अमोल मशीनरी यांच्या माध्यमातून पिठाची चक्की, तृतीय क्रमांक यांस व्ही बी लँडमार्क चे सर्वेसर्वा विशाल सिताराम भुजबळ त्यांच्या माध्यमातून एलईडी टीव्ही बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. या बरोबरीनेच जवळपास 24 भाग्यवान विजेत्यांना विविध आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. आळेफाटा व परिसरातील अधिकाधिक महिलांनी, नागरिकांनी दांडिया महोत्सव, होम मिनिस्टर लकी ड्रॉ योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जगदंबा नवरात्रोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
