ओतूर :

ओतूरच्या तांबेमळा नंबर दोन येथील जय बजरंग गणेश मित्र मंडळातील गणरायाच्या पुढ्यात पैठणीचा खेळ (होम मिनिस्टर) चांगलाच रंगला यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या आयुष्यातील धकाधकीच्या जीवनातून एक दिवस स्वतःसाठी असे समजून या खेळाचा मनमुराद आनंद लुटला यावेळी निवेदक स्वाती फाफळे यांनी महिलांकडून विविध प्रकारचे खेळ सादर करून घेतले या कार्यक्रमाचे आयोजन जय बजरंग गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

पैठणीच्या खेळात प्रथम क्रमांक :- ओतूर पंचक्रोशीत प्रख्यात मृदुंगमणी ह.भ.प. प्रमोद महाराज तांबे यांच्या पत्नी पुष्पा प्रमोद तांबे, यांनी पटकावला तर दुतीय क्रमांक :- गौरी दीपक तांबे, व तृतीय क्रमांक :- पुष्पा जयराम डूंबरे, यांनी पटकावल्याने यांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष मानिक तांबे व उपाध्यक्ष लक्ष्मण डुंबरे, संदीप तांबे, सर्व सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष बबन तांबे, सिताराम डुंबरे, रत्नाकर तांबे, ह.भ.प. प्रमोद महाराज तांबे, बाळासाहेब तांबे, संतोष तांबे, योगेश तांबे, किरण तांबे, शेखर तांबे, गणेश तांबे, सुनील तांबे, विष्णु डुंबरे, शंकर तांबे, प्रसाद तांबे, मिनाबाई तांबे, लक्ष्मीबाई तांबे, रंजना डुंबरे, अनिता तांबे, संध्या तांबे,सूवर्णा तांबे, संगिता तांबे, नलिनी तांबे, रेश्मा तांबे समस्त ग्रामस्थ तांबेमळा नं २. व महिला भगिनी उपस्थित होत्या.

फैय्याज इनामदार
प्रतिनिधी

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!