पाथर्डी:

पाथर्डी तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाने पैसे काढून दागिने लहान ठेवून हजारो रुपयाचे बियाणे मातीमोल झालेले आहेत. तालुक्यामध्ये कापूस उडीद मूग बाजरी सोयाबीन हे पिके पाणी वाचून पूर्णपणे जळून गेले असून शेतकरी हवालदिल झालेला आहे .आजही विहिरींनी तळ गाठललेला असून माणिक दौंडी परिसर टाकळी माणूर परिसर खरवंडी परिसर या भागामध्ये पाण्यासाठी जनतेवर भटकण्याची वेळ आलेली आहे. तरी तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व जनावरांसाठी चारा या गोष्टी शासनाने तातडीने मार्गी लावाव्या यासाठी शिरसाटवाडी गावचे मुंजोबा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनंत राजे कराड शासनाकडे तातडीने मागणी करणार आहेत.

मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!