ओतूर (प्रतिनिधी) :

जुन्नर तालुक्यातील बिबट्याची दहशतीत चागलीच वाढ झाल्याचे ओतूर परिसरात दिसून येत आहे. अहिनवेवाडी सारणी येथील लक्ष्मण दत्तात्रय डुंबरे (वय ७१) हे आपल्या मुला समवेत मोटार सायकल वरुन घरी जात असताना अचानक ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आहे गुरुवार दि.१४ रात्री ९ वाजे सुमारास लक्ष्मण डुंबरे जखमी केले ही माहीती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ओतुर वैभव काकडे,वनपाल सुधाकर गिते,वनरक्षक विश्वनाथ बेले, साहेबराव पारधी,रेस्कुटीम मेबर मंदार अहीनवे,विजय वायाळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ओतुर येथे नेऊन उपचार करुन पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नारायणगाव येथे नेण्यातआले.
अहीनवेवाडी सारणी परीसरात पिंजरा लावला असून दुसरा पिजरा लावण्यात येणार आहे वनविभागाकडून समजते.अहीनवेवाडी व परिसर बिबट प्रवन क्षेत्र असुन ग्रामस्थ यानी घरासमोर लाईट लावावी,एकटे बाहेर फिरुन नये,बरोबर बॅटरी असावी मोबाईल वरील गाणी वाजवावी,पशुधन बंदिस्त गोठ्यात बांधावे असे वनविभागाकडुन अवाहन करण्यात आले आहे

तर ओतूर येथील ब्राम्हणवाडा रोड लगत असलेल्या तांबेमळा रोड जवळील ओमसाई सोसायटीत पंकज भाटे यांचे रो हाऊसचे समोर पार्किंग एरीया मध्ये बुधवार दि.१३ रोजी बिबट्याने रात्री ३.१५ दरम्यान कुत्र्यावर हल्ला करून पकडुन नेताना सिसी टिव्ही मध्ये कैद झाले आहे. या आधोगरही येथून २ वेळा या भागातून दोन कुत्र्यांची शिकार केलेली आहे असे स्थानिकाडून समजते,परिसरात बिबट्या नेहमी येत असतो तरी या घटनेमुळे वाटसरू स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी नागरिक करत आहेत.

फैय्याज इनामदार
प्रतिनिधी

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!