ओतूर :

ओतूर ता.जुन्नर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवलिंगावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या तीन पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे यांनी सांगितले. तिसऱ्या सोमवार निम्मित यात्रेनिमित्त भरलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात कुस्तीशौकीन खूप मोठ्या प्रमाणात आले होते.यात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.तांदळाच्या पिंडींचे दर्शनासाठी भाविकांनी पहाटे ६ पासून गर्दी झाली होती.आरती व महाअभिषेक श्री व सौ अक्षय एकनाथ डुंबरे,विमलेश गांधी,निलेश रामदास वारुळे उपस्थितीयांच्या हस्ते आरती करून मंदिर भाविकांस दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अनिल तांबे,जितेंद्र डुंबरे,सागर दाते,सचिन तांबे,महेंद्र पानसरे,अमोल डुंबरे, तन्मय इसकांडे,महेंद्र पानसरे,सचिन तांबे,जितेंद्र डुंबरे,सतिश तांबे,राजेंद्र हांडे आदी उपस्थित होते.

यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्ताना पटेल ग्रुप कडून १००० किलो खिचडी महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आली तर श्रेयस डुंबरे,अमोल काका डुंबरे,संजोग डुंबरे,तन्मय इसकांडे यांच्यातर्फे राजगिरा लाडू भाविकांना वाटप करण्यात आला.दुपारी कुस्त्यांच्या आखाड्यास सुरुवात झाली. यात लहान मोठ्या दोनशे पेक्षा जास्त कुस्त्या झाल्या. त्यात महिला मल्लांनीही कुस्त्यामध्ये सहभाग घेतला. यावेळी आमदार अतुल बेनके,देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, माजी सभापती विशाल तांबे,ओतूरचे सरपंच प्रशांत डुंबरे,गजानन महाराज शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे,शकील तांबोळी,बबन तांबे,संतोष डुंबरे,स्वरमिल डुंबरे,अतुल गोरे,बाळासाहेब घुले,छबूराव तांबे,आदी उपस्थित होते.कुस्त्यांच्या आखाड्यात प्रकाश डुंबरे,दिगंबर काळे,अविनाश ताजणे यांनी कुस्त्या जमविण्याचे तर जालिंदर ढमाले धनंजय डुंबरे,छबूराव थोरात यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर काळे परिवाराकडून आखाडा व्यवस्थापन केले. तसेच,बबनराव डुंबरे,भाऊसाहेब खाडे,ज्ञानेश्वर खामकर यांनी समालोचन केले. यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला होता.

फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!