आळेफाटा :
रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्या माध्यमातून शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आळेफाटा येथे स्थापन केलेल्या रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या सर्व सदस्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन च्या सर्व अधिकारी वर्गाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.कर्तव्य बजावत असताना रक्षाबंधन सारख्या सणाला या अधिकारी वर्गाला प्रत्यक्ष आपल्या घरी जाऊन सण साजरा करता येत नाही त्यामुळे विद्यार्थीनींनी राखी बांधत असताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद या सर्व अधिकारी वर्गाच्या चेह-यावर दिसत होता.यावेळी उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवाना राखी बांधून जाती धर्मातील ऐक्याचे प्रतिक विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.
यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आळेफाटा रोटरी सेंट्रल चे अध्यक्ष रो.आहेर, शिवनेरी जुन्नर रोटरीचे सचिव रो. धनंजय राजूरकर, रो. विमलेश गांधी, रो.मिलिंद घोडेकर, सादिक आतार व रोटरी इंटरॅक्ट क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. एन. मुलाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली के.बी. शिंदे सर व सौ. आर. आर. आवारी मॅडम यांनी केले.
प्रतिनिधी :- मनीष गडगे ,आळेफाटा