पुणे :

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके  हे राखीमॅन बनले आहेत. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांना जुन्नर तालुक्यातील 10 हजाराहून अधिक महिला भगिनींनी राखी बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेनके कुटुंबाची रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्षाबंधन सोहळ्याला उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राखी बांधण्यासाठी आलेल्या महिलांच्या गर्दीने नारायणगाव येथील आमदार बेनके यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार बेनके यांनी रक्षाबंधनाची सांस्कृतिक परंपरा कायम राखत एक चांगला सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील महिला भगिनींचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्याचे हे उत्तम व्यासपीठ आमदार अतुल बेनके यांनी उपलब्ध करून दिले आहे.

या कार्यक्रमामुळे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन्ही हात राखींनी भरलेले आमदार बेनके यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. राखी बांधण्यासाठी आलेल्या महिला भगिनींसोबत सेल्फी घेत आनंदात आणि उत्साहात त्यांनी हा उत्सव साजरा केला.

आतुरता आणि माझ्या बहिणींना भेटण्याचा हा अविस्मरणीय क्षण … 

रक्षाबंधन…भाऊ बहिणीच्या पवित्र आणि हक्काच्या  नात्यातील प्रेम, विश्वास, ऋणानुबंध वाढवणारा सण … दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुन्नर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अनेक भगिनींनी नारायणगाव येथील आमच्या निवासस्थानी येऊन मला प्रेमाने आपुलकीने राखी बांधल्या. अतिशय उत्साहात आणि आनंदाने आम्ही रक्षाबंधन सण साजरा केला. खरं तर या दिवसाची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो बेनके कुटुंब आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणींना भेटून आनंद साजरा करण्याचा हा दिवस. दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या या सर्व भगिनींनी यावर्षीचा रक्षाबंधन सोहळा आणखी अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांची भावना मला शब्दांत व्यक्त करता येत नाहीये.

तुम्हां सर्वांच्या प्रेमाची आणि विश्वासाची कायम जाण ठेवून, उत्साहाने, जबाबदारीने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मला मिळाली. हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील याची खात्री देतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अशी भावना यावेळी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केली.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!