सोलापूर :

रक्षाबंधनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या सांस्कृतिक विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व मुलींसाठी स्वनिर्मित राखी उपक्रम आयोजित केला होता. आपल्या जीवाची तमा न बाळगता सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी रक्षासूत्र तयार करण्यासाठी सर्व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित चारशे राख्या आपल्या कल्पनाविष्कारातून राष्ट्रध्वजाच्या रंगांच्या अतिशय आकर्षक व मनोवेधक विविध राख्या तयार केल्या. सदर सर्व राख्या आकर्षक पॅकिंग करून सीमेवरच्या जवानांसाठी श्री अरुण कुमार तळीखेडे (जिल्हाध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटना)यांच्याकडे शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.प्रज्ञा चव्हाण हिच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री योगेश राऊत सुपरवायझर श्री शिवराज बिराजदार यांची प्रेरणा व बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ विजया बिराजदार तसेच सदस्य ऐश्वर्या हिरेमठ, नागेश्वरी कोंगारी व श्रुती कुलकर्णी व कला शिक्षक श्री सहदेव भालेकर यांनी परिश्रम घेतले.*स्वातंत्र्य दिन महोत्सव व रक्षाबंधनाचे औचित्य साधत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचा भारतीय जवानांसाठी रक्षा सूत्र उपक्रम स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यासाठी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या सांस्कृतिक विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व मुलींसाठी स्वनिर्मित राखी उपक्रम आयोजित केला होता. आपल्या जीवाची तमा न बाळगता सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी रक्षासूत्र तयार करण्यासाठी सर्व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित चारशे राख्या आपल्या कल्पनाविष्कारातून राष्ट्रध्वजाच्या रंगांच्या अतिशय आकर्षक व मनोवेधक विविध राख्या तयार केल्या. सदर सर्व राख्या आकर्षक पॅकिंग करून सीमेवरच्या जवानांसाठी श्री अरुण कुमार तळीखेडे (जिल्हाध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटना)यांच्याकडे शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.प्रज्ञा चव्हाण हिच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री योगेश राऊत सुपरवायझर श्री शिवराज बिराजदार यांची प्रेरणा व बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ विजया बिराजदार तसेच सदस्य ऐश्वर्या हिरेमठ, नागेश्वरी कोंगारी व श्रुती कुलकर्णी व कला शिक्षक श्री सहदेव भालेकर यांनी परिश्रम घेतले

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!