आळेफाटा :

संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज समाधी सोहळा व पुण्यतिथीनिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे ( वर्ष – 40 वे ) सोमवार दि 17 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताहची हभप तुळशीराम महाराज सरकटे ह्यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.दि 10 जुलै रोजी हभप मधुकर महाराज गिरी, दि 11 जुलै रोजी हभप निलेश महाराज कोरडे, दि 12 जुलै रोजी हभप महेश बाळसराफ, दि 13 जुलै रोजी हभप आरतीताई मगर, 14 जुलै रोजी हभप सुरेखाताई शिंदे, दि 15 जुलै रोजी हभप रामचंद्र महाराज इंगोले, दि 16 जुलै रोजी बजरंग महाराज कर्जुलेकर, दि 17 जुलै रोजी काल्याचे किर्तन हभप तुळशीराम महाराज सरकटे या सर्वांच्या कीर्तनाची प्रतिदिन कीर्तनसेवा संपन्न झाली.रविवार दि 16 जुलै रोजी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला सामील झाल्या होत्या.महिलांनी डोक्यावर कलश घेऊन, पुरुषांनी हातात झेंडे घेत सावतामाळी मंदिर ते मुक्ताई माता मंदिर येथे पायी मिरवणूकीमध्ये सामील झाल्या.


यामध्ये देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गणेश वाघमारे, उपाध्यक्ष सुरेश भिमाजी गडगे, सचिव अशोक सीताराम गडगे, रवींद्र गडगे, सचिन गडगे, सुरेश नामदेव गडगे, सोमनाथ गडगे, बारकु गडगे, गोपाळ फुलसुंदर, विनोद गडगे, शिवाजी शिंदे, गणेश गडगे, अनिल गडगे, प्रकाश गडगे, गणपत गडगे, महेंद्र भुजबळ, श्रीहरी भुजबळ, दीपक गडगे, संजय गडगे, अमृता गडगे, अनुराधा गडगे, संजीवनी खोकले, शांताबाई भिमाजी गडगे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संत सावतामाळी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.त्यावेळी हातात झेंडा घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करण्यात आला.पुरुष महिला भाविकांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला.

यावेळी मिरवणुकीमध्ये आळेफाटा येथील हिरकणी महिला ग्रुपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात लेझीम नृत्य सादर केले.मंदिरात पारायण समाप्ती झाल्यानंतर पारायणासाठी बसलेल्या गणेश निवृत्ती गडगे, गोरक्ष नारायण भुजबळ, सीताराम कृष्णाजी भुजबळ, पांडुरंग देवराम गडगे, दत्तात्रय तुकाराम वाघमारे/दत्तात्रय बबुशा गडगे, शंकर धर्माजी वाघमारे, शंकर काशिनाथ गडगे, विष्णु दावला काचळे, शिवाजी लक्ष्मण देवकर, श्रीमती संजीवनी रामदास खोकले, अंजनी गणपत भुजबळ, मंगल ज्ञानेश्वर गडगे, शोभा सुनील गडगे, अलका संपत राहाणे, अंजली विलास सोनवणे, संगीता प्रकाश पानसरे, संगीता दिलीप शेळके, सविता विजय आवटे, शारदा तुकाराम हांडे, मंगल वसंत देवकर, सुनीता सुरेश वाव्हळ, सायली सोपान गडगे, मोनाली विशाल बटवाल, अनुजा दत्तात्रय गडगे, सुनीता शिवाजी देवकर, पवन चंद्र्हास्य वाव्हळ, आयुआयुष्य अशोक कणसे, विमल सतिश वाव्हळ, श्रीमती नलिनी कालिदास सासवडे ह्यांचा शाल, पुष्प, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कै गोविंदराव मारुती गडगे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय व शिवछत्रपती विद्यालयातील इयत्ता दहावी परीक्षेत प्रथम पाच क्रमांकातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयातील हेमंती संदिप गडगे, आदिती प्रशांत सोनवणे, सोहम जनम सरोदे, अनुष्का वसंत लाड, पलक ज्ञानेश्वर चौगुले ह्या पाच विद्यार्थ्यांचा तर शिवछत्रपती विद्यालयातील समृद्धी प्रसाद हांडे, भाग्यश्री संदीप गडगे, यश विक्रम जोगदंड, गौरी बाळू कापूसकर,वैष्णवी प्रकाश डोके ह्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर चिट्ठी द्वारे निवडलेल्या सात महिलांना पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सप्ताह कालावधीत अन्नदान देणारे अन्नदाते, युट्युब सौजन्य देणारे, ज्ञानेश्वरी ग्रंथ सौजन्य देणारे, पैठणी सौजन्य देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला

तसेच सप्ताह कमिटीचे अध्यक्ष प्रमोद मुरलीधर गडगे, उपाध्यक्ष संदेश तुकाराम शिंदे, सचिव लक्ष्मण विठ्ठल बटवाल, सहसचिव शरद रामचंद्र शिंदे, खजिनदार शंकर काशिनाथ गडगे, सदस्य प्रकाश गणपत गडगे, सदस्य संदीप सुखदेव गडगे, संदीप तुकाराम गडगे, संतोष तानाजी शिंदे, सतीश रामभाऊ गडगे, संतोष लक्ष्‍मण गाडेकर, जयराम काशिनाथ भुजबळ, गणेश नारायण गडगे, जीवन प्रकाश गडगे, प्रशांत विलास गडगे, विकास सखाराम शिंदे, प्रणव दिलीप गडगे, राहुल सुदाम शिंदे, सागर नारायण वाघमारे, मयूर रामचंद्र शिंदे, आदित्य योगेश गडगे, रोहित संतोष शिंदे, तुषार दत्तात्रय गडगे व्यवस्थापक दत्ता वसंत शिंदे इ. सर्वानीच सप्ताह यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!