अहमदनगर :
पावसाचा लहरीपणा कमी पाऊसमान दुष्काळ सदृश्य परिस्थिती यामुळे पाण्या अभवी पिके सुकू लागली आहेत .त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. मुळा धरणात पाणीसाठा मुबलक शिल्लक असून त्यातून लवकरात लवकर पिकासाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडावे जेणेकरून लाभक्षेत्रातील पिकांना जीवनदान मिळेल. यामुळे मुळा धरणातून तातडीने आवर्तन सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील आणि सभापती क्षितिज भैय्या नरेंद्रजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडवण्यासाठी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी लवकरात लवकर आवर्तन सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय कोळगे, राजेंद्र देशमुख ,रघुनाथ उगले, दिलीप आव्हाड ,दीपक नन्नवरे ,यशवंत पाटेकर ,पांडुरंग दातीर ,विष्णू मुटकुळे ,महादेव आव्हाड, रोहन साबळे ,संकेत वांढेकर आदी उपस्थित होते.
मधुकर केदार
ग्रामीण प्रतिनिधी ,अहमदनगर