शेवगाव :
मा.आमदार नरेंद्रजी घुले पाटील आणि मा.आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी न सोडल्यास तीव्र प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनादवारे दिल्या नंतर प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पडले.
शेवगाव पंचायत समितीचे सभापती सभापती डॉ .क्षितिजभैय्या नरेंद्रजी पाटील यांच्या मागणीला यश, काही दिवसापूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे निवेदनादवारे मागणी केली होती. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाताशी आलेले पिके जळून जाण्याच्या मार्गावर असताना मोठे संकट शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झाले होते .परंतु मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी घुले पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत एक तारखेपासून आवर्तन सोडण्याचे नियोजन केलेले आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणार असून त्यातून शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.यामुळे शेवगाव पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे.घुले यांनी घेतलेले या आक्रमक भूमिकेमुळे पाणी सोडण्याची नियोजन झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ वतीने घुले पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
मधूकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
