उदापूर:

दिलीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. उदापूर संचालक पदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली त्यामध्ये प्रकाश कुलवडे यांना चेअरमन पदी तर मनोज चौधरी यांना व्हा.चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी डी.एम.डोके यांनी दिली.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार जुन्नर तालुक्याचे माजी आमदार व पतसंस्थेचे संस्थापक दिलीपराव ढमढेरे यांनी केला तसेच येणाऱ्या पुढील काळात त्यांच्याकडून उत्तरो उत्तर प्रगती होईल अशा शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत नवनिर्वाचित संचालक माजी आदर्श अध्यक्ष बबन गणपत कुलवडे, माजी आदर्श सरपंच बबन निवृत्ती कुलवडे, ज्ञानेश्वर नारुडकर, भागोजी कुलवडे, दत्तात्रय कुलवडे, शांताराम भले, बाजीराव कुलवडे, अश्विनी कुलवडे, छाया कुलवडे, तर तज्ञ संचालक संतोष होनराव, दत्तात्रय आरोटे,यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच व्यवस्थापक म्हणून दिलीप कुलवडे व कर्मचारी बबन किसन कुलवडे उपस्थित होते.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!