आळेफाटा (वार्ताहर) :

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत बहुमूल्य योगदान व दिशादर्शक काम केल्याबद्दल गोमाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आळेफाटा (वडगाव आनंद ) या संस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार 2023 महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते अमित बेनके, राज्य फेडरेशन संचालक भास्कर बांगर, सहायक निबंधक सचिन सरसमकर, जुन्नर पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष महादेव वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन सुरेश गडगे, व्हाईस चेअरमन राहुल खोकले, सचिव रवींद्र गडगे, संचालक कोंडीभाऊ वामन, अशोक गडगे, गजानन गडगे, भानुदास गडगे, नितीन चौगुले, श्रीमती शांताबाई गडगे, संगीता शिंदे, आशा आल्हाट, तज्ञ संचालक अर्जुन अमूप, संतोष साबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी गडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या आळेफाटा, बनकरफाटा, वाशी अशा एकूण तीन शाखा आहेत. संस्था संपूर्ण संगणकीकृत असून अद्यावत कोर बँकिंग प्रणाली उपलब्ध आहे. संस्था ग्राहकांना आरटीजीएस, आय एम पी एस, एस एम एस सुविधा देत आहे. संस्थेला पुरस्कार मिळाल्याच्या कामगिरीबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!