मुंबई :

शिंदे-फडणवीस सरकारने  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या  महागाई भत्त्यात राज्य सरकारने वाढ केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता   आता 34 टक्के झाला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने  एसटी महामंडळाला अधिकृत पत्र देखील पाठवले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील 34 टक्के महागाई भत्ता मिळावा यासाठी एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याबाबत या संघटना वारंवर सरकारकडे मागणी करत पाठपुरावा करत होत्या. त्यासोबत या संघटनांनी सरकारला आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला होता. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. पण एसटी कर्मचाऱ्यां मात्र 28 टक्के टक्के महागाई भत्ता मिळत होता. या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित 6 टक्के महागाई भत्ता मिळावा म्हणून एसटी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सलग तीन वेळा भेट घेतली होती. या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.

अखेर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत 34 टक्के महागाई भत्ता लागू केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रयत्नांना यश आले. 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाने अधीकृत पत्र महामंडळात पाठवले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी कर्मचारी संघटना आणि राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारचे आभार मानले आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!