सोलापूर :-
लायन्स क्लब इन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या वतीने लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीचे माजी अध्यक्ष,माझी झोन चेअरमन आणि जेष्ठ लायन, सोलापूर जिल्हा तायकॉदो स्पोर्ट्स कॉनशील असोशीयन चे विद्यामान अध्यक्ष मोहन भूमकर यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग ता. तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद आपले घर बालग्रह या संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यां ना गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले. संस्थेचे प्रमुख श्री पन्नालालजी सुराना, अॅड. श्री रामभाऊ मेत्रस सर, श्री गुंडू पवार सर, श्री विलास वकील श्रीदत्ता गायकवाड, सु.श्री. सुलभाताई पिशवीकर, सु. श्री. पुष्पाताई आगरकर, श्री राजूसा शालगर दर्शन गारमेंट यांच्या शुभहस्ते कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीचे अध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य,शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. लायन मोहन भूमकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम राबविले. त्यांनी आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात पुरतेच काम न करता इतर वाड्या वस्त्या वर जिथे खरंच गरज आहे त्यांनी मदत केले आणि करतात. आजपर्यंत शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, धार्मिक क्षेत्रात भरीव असे कार्य कार्य करत आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी हे जोपासत गुरूविद्या प्रतिष्ठान,हरीऒम विणकर बाग मॉनिग ग्रुप येथे सल्लागार चे काम करत आहेत. आभार प्रदर्शन क्लबचे सचिव यांनी केले.