उदापूर,जुन्नर

कोरोना काळात समाजिक सुरक्षितता लक्षात घेऊन या संकट काळात उल्लेखनीय कामगिरी करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बहुमोल योगदान देणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार रविंद्र भोर यांना चाईल्ड फंड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने “कोरोना योद्धा” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रविवार दि. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त चिंचोली(काशिद)ता.जुन्नर येथे महिलांसाठी संसर्गजन्य आजारांच्या संदर्भात चाईल्ड फंड इंडिया,भारत सॅनिटायझेशन व सिटी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला यावेळी पोलीस,आरोग्य कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच रविंद्र भोर व जितेंद्र पुंडे यांना कोरोना काळात उल्लेखनीय योगदान दिले म्हणून विशेष सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


गेली दोन वर्षे भारत देशात कोरोना या महामारीने थैमान घातले होते,कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र,राज्य सरकारला मोठा संघर्ष करावा लागला.यावेळी अनेक शासकीय, निमशासकीय तसेच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अनेक लोकांनी उत्कृष्ट काम करून योगदान दिले आहे.याच कालखंडात रविंद्र भोर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या व चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात फ्रंटलाईन वर्कर”म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारली होती. चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या लसीकरण जनजागृती मोहिमेत “ब्रँड अँबेसेडर” म्हणून जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात लसीकरण बाबत जनजागृती करण्यात मोलाचे योगदान दिले. सद्या या संस्थेच्या वतीने महिलांचे”आरोग्य व सक्षमीकरण”या मोहिमेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान देत आहेत.याशिवाय ग्रामपंचायत उदापुर,पंचायत समिती जुन्नर यांच्या कोरोना पासून बचाव मोहिमेत सहभागी झाले होते.याशिवाय चाईल्ड फंड इंडिया व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गरजूंना औषधें, सॅनिटायझर,मास्क,फूड व फ्रुट किट वाटप करण्यात पुढाकार घेतला या सर्व कार्याची दखल घेऊन चाईल्ड फंड या संस्थेने रविंद्र भोर यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले.

चाईल्ड फंड इंडिया ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून संपूर्ण देशभर व खास करुन जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात शैक्षणिक,सामाजिक व आरोग्य विषयक आणि अनाथ,गरीब,गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असे विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहेत.जुन्नर तालुक्यात देखील महिलांचे आरोग्य व स्वावलंबन यासाठी संस्थेने भरीव निधी दिला आहे.

या सत्कार समारंभ प्रसंगी चाईल्ड फंड इंडिया संस्थेचे पुणे शाखेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजित मदने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक संतोष कांबळे, मुक्ता गिरी,प्रकल्प समन्वयक अजित सोर,अक्षय तांबे,कम्युनिटी मोबिलाईझर महेश नायकोडी,विश्वास गालफाडे,प्रदिप दारुळे,ग्रामसंघाच्या अध्यक्षा सविता काशिद,कल्पना टेमगिरे,धनश्री काशिद,प्रियांका वाजे,ग्रामविकास आधिकारी अर्चना केदारी,किशोर वारुळे, आदिमान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन चिंचोली काशिद चे सरपंच खंडू काशिद यांनी केले.

 प्रतिनिधी:- दुष्यंत बनकर,उदापूर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!