ओतूर :-
इयत्ता १०वी व १२वी पास झालेल्या मुलामुलींनी पुढील करिअर निवडताना अतिउत्साही न होता विचारपूर्वक व संयम राखत स्वतः मधीलकौशल्य आणि आवड यांचा योग्य संयोग वापरून भविष्यातील करीअर निवडावे,त्यास सकारात्मक दृष्टीकोनाची जोड देऊन अभ्यास केल्यास ध्येय निश्चित प्राप्त होते असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शनक रविंद्र भोर यांनी चाईल्ड फंड इंडिया,कोळवाडी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात केले.
सांगणोरे ता:-जुन्नर येथील अंगणवाडी सभागृहात चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत या आदिवासी भागातील इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या १७ ते२४ वयोगटातील मुलामुलींना करिअर निवडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून त्यांना भविष्य योग्य करिअर निवडुन प्राप्त व्हावे यासाठी संस्थेने करिअर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून रविंद्र भोर यांना प्रमुख पाहुणे म्हणून नियुक्त केले होते.

यावेळी रविंद्र भोर यांनी उपस्थित मुलामुलींना स्वानुभव व विविध स्थानिक उदाहरणे देत समजावून सांगितले.विद्यार्थ्यांनी मिळालेले मार्क,मित्रमंडळींचा कल,नातेवाईकांचे मत यांचा विचार न करता स्वतःची आवड व स्वतःमध्ये असणारे कौशल्य आत्मसात करून करिअर निवडणे आणि सकारात्मक विचार करत भविष्यात निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आठ गुण असतात ते करीअर निवडताना उपयोगात आणले गेले पाहिजेत कारण आयुष्यात इ.१०वी,१२वी,पदवी धर,पोस्ट पदवीधर होताना करिअर निवडण्याची संधी मिळते ती गमावता कामा नये.
या कार्यक्रमांसाठी चाईल्ड फंड इंडिया या संस्थेचे पुणे शाखेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजित मदने,प्रकल्प समन्वयक अजित सोर, फिल्ड ऑफिसर अक्षय तांबे,समुदाय संघटक,विजय भोईर,माधुरी घोलप उपस्थित होते.
प्रतिनिधी:- फैयाज ईमानदार,ओतूर
