निमगाव सावा,जुन्नर
जुन्नर तालुक्यातील पुर्व भागातील निमगाव सावा या ठिकाणी विविध गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या.श्री स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ शिरोलीवाट या मंडळांनी पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरवणूक आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पाडली.
खासकरुन या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाचे आकर्षण दिसून आले. याप्रसंगी होमगार्डचेगणेशभाऊ गाडगे,सुनिलभाऊ गहिने नारायणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय धुर्वे साहेब,पोलीस नाईक संतोष दुपारगुडे साहेब,दिनेश साबळे साहेब, कोतकरमामा पोलीस. पाटील अनिल टांकसाळे , होमगार्ड गणेश गाडगे,आरिफ पटेल, दत्ताभाऊ डुकरे फिटर , सुनिल गहिने, रुपेश बेहेडे कल्पेश गाडगे आदि मान्यवर उपस्थित होते
प्रतिनिधी: राजेंद्र भोर बोरी
