निघोज,ता.पारनेर
गेली दहा दिवस गणेश मंडळांनी गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करीत, धार्मिक, सामाजिक, स्पर्धात्मक उपक्रम राबवीत तसेच विद्युत रोषणाई करीत गावचा नावलौकिक वाढवला, विसर्जन मिरवणुकीत सर्वच मंडळांनी सहभाग घेतला.


अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढीत आनंदमय वातावरण निर्माण करीत गणपती बाप्पांचा आशिर्वाद मिळण्यासाठी यथोचित परिश्रम घेतले. प्रशासकीय नियमानुसार मिरवणूकीचे नियोजन करीत वेळेतच विसर्जन मिरवणूका संपन्न केल्या. या सर्वच मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभले याबद्दल सर्व गणेश मंडळांना खूप खूप धन्यवाद व हार्दिक आभार


तसेच पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व हेडकॉन्स्टेबल डहाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलिसांनी उत्कृष्ट नियोजन करीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला त्याबद्दल पोलिस प्रशासनाला खूप खूप धन्यवाद व हार्दिक आभार अशाप्रकारे यापुढेही प्रत्येक उस्तवात आपला सहभाग अपेक्षित आहे.सहकार्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक आभार,अशी भावना संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी व्यक्त केली
