जुन्नर,पुणे
प्रतिनिधी :- फैयाज इनामदार
काल जुन्नर तालुक्यातील अनेक भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे
आज खामुंडी आणि गायमुखवाडी भागातील शेतकऱ्यांसमवेत या भागात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी तालुक्याचे आमदार श्री.अतुल बेनके यांनी केली. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी माती वाहून गेली आहे, काही ठिकाणी भरावे खचले आहेत, पिके वाहून गेली आहेत, कांदा चाळीत पाणी गेले आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत आमदारानपुढे व्यथा मांडल्या. या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करण्याबाबतच्या सूचना आमदार अतुल बेनके अधिकाऱ्यांना दिल्या.
ह्या पाहणीसाठी जुन्नर चे तहसीलदार रविंद्र सबनीस साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तोटावर साहेब, इतर प्रशासकीय अधिकारी,गायमुखवाडी गावचे सरपंच वनराज शिंगोटे, उपसरपंच अमोल वंडेकर,मा.पं. स.सदस्य सुरेखाताई वेठेकर, सुभाष बोडके, संदीप गंभीर, राहुल जाधव, बिपीन मिंडे, धर्मा जाधव, कैलास बोडके उपस्थीत होते.