आळेफाटा ( वार्ताहर ) :
अभंगवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार शनिवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते 11.30 या वेळेत शाळेचे मैदान परिसरात भरविण्यात आला. विद्यार्थी यांनी विक्रेते आणि ग्राहकसुद्धा अशा दोन्ही भूमिका बजावल्या. ग्रामस्थांनी, पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभंगवाडी यांनी आयोजित केलेल्या आठवडे बाजार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्यमान ग्रा.प.सरपंच मेघाताई काकडे, उपसरपंच मयुर पवार, शेतकरी संघटना अध्यक्ष संजय भुजबळ, माजी सरपंच दादाभाऊ काकडे, ग्रा.प सदस्य सत्यवान काकडे, ग्रा प सदस्य सतिश काकडे, माजी ग्रा प सदस्या वैशाली काकडे, वैशाली कजबे, तेजश्री शिंदे, वाघुले सर, अशोक रासकर, मंगेश रासकर, संतोष गोरगले, ओ.बी सी संघटना अध्यक्ष सिताराम अभंग, अंकुश भटकळ, राजेश काकडे, दिनेश झोडगे, सत्यवान अभंग, संदीप अभंग, बाळासाहेब अभंग, मंगेश अभंग, सचिन अभंग, रामदास बढे, सोपान अभंग, कन्हैय्या अभंग, गणपत अभंग, सुजित अभंग, संतोष अभंग, सिध्देश बढे, सुजित अभंग, प्रणव अभंग, किरण अभंग, प्रविण अभंग, विकास अभंग व महिला वर्ग, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व्हावे व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थी – शिक्षक – पालक यांच्या माध्यमातून संयुक्तरित्या उपक्रम राबविण्यात आला. बाजारात विविध भाजीवाला, खाण्याचे पदार्थ, खरेदी-विक्री साठी ठेवण्यात आला. मुख्याध्यपिका सविता घाडगे मॅडम, निलेश शिंगोटे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश अभंग आदी सदस्यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. उपस्थित सर्वांचे नवनाथ अभंग यांनी आभार मानले.
