पैठण :
पैठण तालुक्यातील चितेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चितेगाव ग्रामपंचायत समोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे अंतरवाली सराटी येथे समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरागे पाटील हे गेली अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहिलं असा निर्धार त्यांनी केला आहे त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस असून अद्यापही शासनाच्या वतीने आरषणा संदर्भात ठाम भूमिका समोर आलेली नाही मनोज जरागे पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जहीर करावे या करीता चितेगाव येथील मराठा समाज्याने उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चितेगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण चालू राहील असे आव्हान उपोषण कर्ते यांनी केले .
मधुकर बर्फे
प्रतिनिधी
