ओतूर :-
नगर -कल्याण महामार्गावर ओतुर येथील कोळमाथा दत्तभेळ हॉटेल समोर पिकअपने मोटारसायकल व घरी चालत जात असलेल्या मुलीचा अपघात होऊन मोटारसायकलवरील महिला व साईड पट्टी वरून चालत चाललेली मुलगी ठार झाल्याची माहिती ओतुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक सचिन कांडगे यांनी दिली.अधिक माहिती अशी की बुधवार दि . २०रोजी सायंकाळी ६:३०च्या सुमारास ऋतुजा डुंबरे रस्त्याने घरी चालत तर गीताराम नामदेव तांबे व पत्नी सविता तांबे रा.ओतूर ता.जुन्नर हे आळेफाट्याच्या दिशेने मोटारसायकल वरून जात असताना भरधाव पिकअप एम एच १४ के एच ५१३७कल्याणच्या दिशेने जात असताना ओतुर कोळमाथा येथील दत्तभेळ हॉटेल समोर भीषण अपघात झ़ाला .पिकअप रस्ता सोडुन दुसऱ्या दिशेला जाऊन पलटी झाली यात मोटार सायकल वरील महिला सविता गिताराम नामदेव तांबे (वय ४५)व साईडपट्टी वरील मुलगी ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९)जागीच ठार झाली असून गिताराम नामदेव तांबे जखमी झाले आहॆ .पिकअप वाहन निघोज येथील असून चालक पिकअप जाग्यावर सोडुन फरार झ़ाला असून पुढील तपास ओतूर पोलीस करत आहॆ.ओतूर परिसरातून अशी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होतं आहॆ .
फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर