पैठण :
जिल्हा छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील बिडकीन येथे बि जी कंपनी समोर पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्या मध्ये हबीब तय्यब अब्दुल कादर वय 32 वर्ष रा बिडकीन ता पैठण जि औरंगाबाद या तरुणाचा मृतदेह 27, सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 10,10,च्या दरम्यान आढळून आला आहे पैठण औरंगाबाद समांतर जलवाहिनी व रोडचे काम चालू आहे पाईप लाईन साठी दहा ते पंधरा फूट खड्डे खोदून ठेवले आहे हे खड्डे पावसाच्या पाण्याने पूर्णताहा भरले असून पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले मृतदेहाची खबर मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात तपासणी करीता दाखल करण्यात आले तय्यब हबिब अब्दुल कादर यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित करण्यात आले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून सदरील घटनेचा पुढील तपास स पो नी सुरवसे साहेब यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे व पो हे कॉ धनेधर हे करीत आहे
प्रतिनिधी :- मधुकर बर्फे
