ओतुर :
दि. ०१ ऑक्टोबर रोज़ी रात्रि ७ः३० वाजता ओतुर घुलेपट येथील श्री गंगाराम तांबे हे आपल्या पत्नी सौ मनिषा गंगाराम तांबे वय 45 समवेत आपल्या घरी मोटारसायकल वरुन जात असताना अचानक ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ल्या करून जखमी केले ही माहीती मिळताच मा वनपरिक्षेत्र अधिकारी-ओतुर श्री वैभव काकडे ,वनपाल श्री सुधाकर गिते ,वनरक्षक श्री सुदाम राठोड ,श्री विश्वनाथ बेले,श्री किसन खरोडे यानी जागेवर जाऊन पहाणी करून यानी प्राथमिक आरोग्य केंद्र ओतुर येथे नेऊन उपचार करुन पुढील उपचारासाठी जुन्नर येथे नेऊन उपचार करण्यात आले सदर परिसरात बिबट पिंजरा लावण्यात आला आहे.

ओतुर घुलेपट परीसर बिबट प्रवन क्षेत्रात येत असल्याने घरासमोर लाईट लावणे ,एकटे फिरु नये,बरोबर बॅटरी असावी ,मोबाईल वर गाणी वाजवण्यात यावीत ,पशुधन बंदिस्त गोठ्यात ठेवावेत असे वनविभागाकडुन वन्यजीव सप्ताह निमित्त अवाहन करण्यात आले आहे.
फैय्याज इनामदार
प्रतिनिधी
