शेवगाव :
शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथेश्री तुळजाभवानी मंदिर वर्धापन दिनानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी त्यांनी संत तुकाराम महाराज यांचा एवढा प्रभू भावे देणे संपुष्टी राहावे, तेणे धरावी ती इच्छाहा संत तुकाराम महाराजांचा भावभक्तीपर प्रेम करणारा असा भगवंत कोठे आहे हा अभंग सोडवला तुळजाभवानी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ह भ प एकनाथ महाराज नरवडे पैठण यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला, महाराज सांगतात पाप पुण्य समान झाले की मनुष्यजन्म प्राप्त होतो ,संत नामदेव महाराज सांगतात शेवटची पाळी एक मनुष्य जन्म त्या आत्मारामाची जोपर्यंत आपणास ओळख होत नाही तोपर्यंत आपणास मेळ लागू शकत नाही ,आपणास हा नरदेह भजन कीर्तनासाठी मिळालेला आहे ,याच देहात भगवंताचे नाम घेता येते चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय आपणास भगवंताचे दर्शन होत नाही,संत भेट झाल्याशिवाय परमार्थ कळणार नाही, म्हणून संत भेट होणे गरजेचे आहे, देवाची प्राप्ती होण्याकरताच देवीचा वर्धापन साजरा करावयाचा आहे ,देव हृदय मंदिरे आहे देवी गरडवाडी या ठिकाणी भक्तासाठी निर्गुण निराकार रूपाने आदिशक्ती मायेचे स्वरूप घेऊन आलेली आहे, आदिशक्ती मातेचे ध्यान झाले पाहिजे म्हणून त्यासाठी देवी त्रिगुणात्मक आहे, तिचे ध्यान केले की ती भक्तासाठी प्रगट होते भक्ती करत असताना स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे परमार्थ करत असताना नामस्मरणाला महत्त्व आहे, भक्त प्रल्हादासाठी देवाला खांबातून प्रगट व्हावे लागले, भक्त प्रल्हादाची हाक ऐकून खांबातून नारायण देव प्रगट झाले, जशी आपण देवाची भक्ती कराल त्याप्रमाणे तो आपली इच्छा पूर्ण करतो ,परंतु देवाला आवडेल अशी भक्ती करा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमार्थिक सुखाची प्राप्ती करावयाची असेल तर योग्य मार्गानेच जावे लागेल चोखोबारायाच्या पत्नीचे बाळंतपण करण्यासाठी देव चोखोबाच्या बहिणीचे रूप घेऊन आले, असा परमात्मा त्याच्या भक्तासाठी प्रगट होतो, कार्यक्रमास ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, समस्त ग्रामस्थ गरडवाडी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले .
मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
