श्रीरामपूर :

एमबीबीएसच्या नंतर मेडिसिन एमडी ही पदवी धारण केल्यानंतरही भारत मातेच्या सेवेचा ध्यास घेऊन भारतीय सैन्यात, सेना चिकित्सा कोर(AMC) मध्ये मेडिकल स्पेशलिस्ट म्हणून जॉईन केले. त्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागामध्ये आपली सेवा दिली. त्या माध्यमातून विविध प्रकारचे सेना पदक त्यांनी हासील केले ज्यामध्ये. सैन्य सेवा मेडल, काउंटर इन्सर्जन्सी मेडल, मरुस्थल मेडल, सियाचीन मेडल, (दोनदा) हाय अल्टि मेडल, विदेश सेवा मेडल, नाईन इयर्स सर्विस मेडल, ७५ इयर्स इंडिपेंडेंस मेडल. पदकांचा समावेश आहे. 14 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांची भारतीय सेनेच्या चिकित्सा कोर मधून सेवानिवृत्ती झाली, प्रसंगी त्यांची जन्मभूमी श्रीरामपूर येथे मोठा सेवापूर्ती सोहळा घडून आणला गेला. अमर जवान स्मारक बेलापूर नाका श्रीरामपूर येथे पुष्पचक्र अर्पण करून, श्रीरामपूरच्या पेठेमध्ये त्यांची देशभक्ती गीतामध्ये मिरवणूक काढण्यात आली, भारतीय सेना दलाच्या बँड धून मध्ये श्रीरामपूर शहर दणाणले होते. सोमेश्वर गायकवाड यांच्यावर हार पुष्पांचा वर्षाव श्रीरामपूर भूमी मध्ये करण्यात आला.सेवापूर्ती कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात आजी-माजी सैनिक उपस्थित होते. यश फाउंडेशन चे संस्थापक सचिव व माजी सैनिक श्री संजय डोंगरे यांनी यश फाउंडेशन व शेवगाव तालुका माजी सैनिक संघाच्या वतीने कर्नल सोमेश्वर गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व बुकेच देऊन सत्कार केला. प्रसंगी कर्नल डॉ. सर्जेराव नागरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, कॅप्टन सांगळे , कॅप्टन तांदळे सुभेदार सचिन कसाब, सुभेदार फसले , सुभेदार साठे, माजी सैनिक दुशांत घुले, शिवाजीराव वाघमारे इत्यादी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी  :- मधुकर केदार

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!