ओतूर :
अवघ्या ९ दिवसांनी १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजारा होत आहे .उत्सव साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळे तयारीला लागली असून ओतूर पोलीस उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची आढावा बैठक शनिवार दि ९ सप्टेंबर रोजी ओतूर येथील क्रिडा संकुल येथे घेण्यात आली.गणेशोत्सव अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षता व गणेश मंडळांना उद्भवणाऱ्या अडचणीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सुचनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व ओतूर पोलीस स्टेशनचे साह्ययक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचा आढावा घेवून पोलीस विभाग आणि इतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य समन्वय साधून सदर सुचनांची पुर्तता करण्याच्या सूचना देवून मार्गदर्शन केले.यावेळी ओतूरचे सरपंच प्रशांत डुंबरे,माजी सरपंच प्रेमानंद अस्वार,अनिल केरुलकर, रोहित बोंबले,महेश पठारे,ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी,पोलीस पाटील यांच्यासह,सदस्य बैठकीस उपस्थित होते.
फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
