खामुंडी :
कल्याण नगर महामार्गा वरून खामुंडी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीतून एक मनोरुग्ण चित्र विचित्र हावभाव करीत पायी आळेफाट्याच्या दिशेने चालत जात असताना खामुंडी ग्रामस्थांना नजरेस पडला. पत्रकार कैलास बोडके व सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार यांनी त्यास मिसळ हाऊस येथे नेले व ( बिनाई अन्नछत्र, भुकेल्याला एक घास उपक्रमाअंतर्गत ) गाडीत असलेला जेवणाचा डबा त्यास खायला देऊन अधिक विचारणा केली असता त्याने लालप्पा नरसिव्हा आणि गाव बिदर एवढेच म्हणाला बोडके यांनी बिदर पोलीस स्टेशनचा नंबर गुगल वर सर्च केला व या मनोरुग्णाबाबत माहिती दिली असता बिदर पोलीस स्टेशनचे ए.एस. आय. सी. एस. ज्योती यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे सर्व चौकशी करून त्या मनोरुग्णाच्या बहिणीला शेलार यांचा मोबाईल नंबर दिला तो पर्यंत ओतूर पोलीस स्टेशनला देखील संपर्क करून सर्व हकीकत कथन केली, ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व हवालदार महेश पटारे यांनी दखल घेत पुण्यात रहाणाऱ्या लालप्पाच्या बहिनीला संपर्क करून त्याचा भाचा आणि दाजी त्यास नेण्यासाठी लगोलग खामुंडीला आले. तो मनोरुग्ण असल्यामुळे एका जागेवर थांबत नव्हता शेवटी सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान त्याचे नातेवाईक पुण्यावरून आले व त्याला खात्री करून त्यांचे स्वाधीन करण्यात आले.
त्याचे खरे नाव लालप्पा नरसप्पा सोनगर असे असून तो गेली आठ महिन्यांपासून हरवला होता. रक्षाबंधनाचे दिवशी त्याचे बहिणीने या भावासाठी अन्नाचा कणही ग्रहण केला नव्हता अखेर खामुंडी ग्रामस्थांच्या सतर्कतेने भावा बहिणीची भेट झाली याची सर्वत्र चर्चा सुरू होती.तर मनोरुग्णाच्या नातेवाईकांचे चेहरे आनंदाने ओसंडून वहात होते.
फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
