जुन्नर:
दिनांक २५.रोजी सकाळी पंचायत समिती जुन्नर येथे मिटिंग आयोजित केली होती मिटिंगमध्ये शासकीय अधिकारी मा.सबनिससाहेब तहसीलदार जुन्नर ,मा.तिटकरे सो. संजय गांधी निराधार समिती जुन्नर, मा.कोल्हेमँडम पंचायत समिती जुन्नर, मा.ठाकरे साहेब पुरवठा आधिकारी जुन्नर, मा.विशाल तांबे माजी सभापती पंचायत समिती जुन्नर ,मा.भाऊसाहेब देवाडे व्हाईस चेअरमन पुणे जिल्हा दुध संघ ,तालुक्यातील ग्रामसेवक मा.प्रदिप खिल्लारी तालुक्यातील ,सरपंच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मा. पुष्पाताई गोसावी जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग विभाग,मा.शरद शिंदे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग विभाग,मा.भरत कोंडे उपाध्यक्ष पुणे जिल्हा दिव्यांग विभाग,मा.गोविंद ढमाले अध्यक्ष जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग विभाग,मा.सचिन कुऱ्हाडे सचिव जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग विभाग, मा.निवृत्ती कामटकर कार्याध्यक्ष पुणे जिल्हा मा. मंगल कोंडे महिला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग विभाग,मा.किरण टण्णु,मा.याकुब शेख मा.सारिका कदम उपाध्यक्ष जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग विभाग,मा.दिपक चव्हाण संस्थापक राधेश्याम संघटना मा.अरुण शेरकर अध्यक्ष राधेश्याम संस्था,मा. सुनंदा खोमणे,मा.सौरभ मातेले,मा.सविता दुराफे मा. कुतळसर उपाध्यक्ष पुणे जिल्हा प्रहार संघटना, मा. मंगल गांजवे अध्यक्ष महिला प्रहार संघटना जुन्नर,मा . अध्यक्ष.महेंद्र फापाळे मनसे संघटना यासमवेत विविध दिव्यांग बांधवांचे अनेक प्रलंबित प्रश्न आमदार समजावून घेतले तसेच मा.शरद शिंदे यांनी दिव्यांगांचे प्रश्न मांडणी केली.
१.शासकीय निर्णयानुसार ग्रामपंचायत हद्दीतील पाच टक्के राखीव असतात त्यांची अंमलबजावणी होत नाही.
२. महिला दक्षता कमिटीमध्ये दिव्यांग महिलेचा सामावेश आसावा संजय गांधी निराधार योजना वेळेत मिळावी सध्या फक्त १०००/-रुपये मिळतात त्यामध्ये वाढ होण्यासाठी आमदार साहेबांनी लक्षवेधी सुचना विधान परिषदेत करावी जिल्हा परिषद दिव्यांग निधी ६०%टक्के पेक्षा जास्त दिव्यांगांना मिळतो काही दिव्यांग या योजनेपासून वंचित आहेत त्याला शासकीय कर्मचारी जबाबदार आहेत. मा.पुष्पाताई गोसावी यांनी प्रश मांडणी केली.प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगांच्या शासकीय सवलतीचे फलक असावेत दिव्यांग खेळाडूंसाठी साहित्य मिळावे दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यात यावे शासननिर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक दिव्यांग असावा दिव्यांगांच्या पाल्याला नोकरीमध्ये प्राधान्य असण्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न करावेत जुन्नर तालुक्यात दिव्यांग भवन उभारण्यात यावे समन्वय समितीमध्ये एक दिव्यांग प्रतिनिधी घेण्यात यावा दिव्यांगांना पिवळे रेशनकार्ड देण्यात यावे बुथ कमिटीमध्ये एक दिव्यांग व्यक्तीची निवड करावी दिव्यांगाच्या बचतगटास पंचायत समिती कडुन विशेष सहकार्य करण्यात यावे ग्रामपंचायतमधील गायरान जागा दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी देण्यात याव्यात ग्रामपंचायत मधील ५%टक्के वाटप वेळेत करण्यात यावे.
शासननिर्णयानुसार दिव्यांगांना एसटी मध्ये प्रवास करताना कलर युडीआयडी कार्ड ग्राह धरण्यात यावे दिव्यांग कल्याण आयुक्ततांचा आदेश आहे.नारायणगाव डेपो मँनेजर साहेबांना लेखी पत्र आमदार साहेबांनी द्यावे तालुक्यातील जवळ जवळ ५००दिव्यांग बांधव उपस्थित होते. *आमदारसाहेबांनी तालुका स्तरावरील सर्व प्रश्न मार्गी लावले उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी ते १००%टक्के प्रयत्नशील आहेत असे आश्वाशित करण्यात आले दिव्यांग कार्यालय जुन्नरचे उद्घाटन करण्यात आले
फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
