पुणे :
येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हसीनाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. मे महिन्यात त्याचे हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर त्याला अटक झाली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला. एटीएसने प्रदीप कुरुलकर याची कसून चौकशी केली. भक्कम पुरावे जमा केले. त्यानंतर त्याच्यावर पुणे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन हजार पानांच्या या दोषरोपपत्रात अनेक खुलासे केले आहे. यानंतर आणखी एक आरोप प्रदीप कुरुलकर याच्यावर होत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढणार आहेत.
काय आहे आरोप
डीआरडीओचा माजी संचालक प्रदीप कुरुलकर याच्याबाबतीत आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. प्रदीप कुरुलकर महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर याने दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. डीआरडीओतील कंत्राट देताना महिलांचे शोषण केल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता हिच्याबरोबरचे कारनामे उघड होत असताना आणखी एक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानी हसीनाचा चॅट समोर
प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी हसीनाशी केलेल्या चॅटची माहिती समोर आली आहे. हा चॅट दोषारोपपत्रात जोडला आहे. त्यात प्रदीप कुरुलकर याची झारा दासगुप्ताशी ओळख कशी झाली, तिला तो काय म्हणत होता, ही माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर झारा दासगुप्ताला बेबी म्हणत होता.
प्रदीप कुरुलकर याने अनेक महत्वाची माहिती झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेराला दिली. संरक्षण प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची रचना, गुजरातमधील संरक्षण कार्यक्रमात दाखवण्यात आलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची माहिती त्याने दिली. तसेच आपल्या काही क्षेपणास्त्रासंदर्भातही माहिती दिली.
संवादासाठी या ॲप्सचा वापर
प्रदीप कुरुलकर वेगवेगळे ॲप्स वापरत होता. झारा दासगुप्ताशी संवाद करण्यासाठी तो बिग चँट, क्लाऊड चॅटचा वापर करत होता. त्यामाध्यमातून दोघे संवाद करत होते. प्रदीप कुरुलकर याने झारा दासगुप्ताला सरफेस टू एअर मिसाईलबदल माहिती दिल्याची माहिती दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर
एटीएसने प्रदीप कुरुळकरना अटक करून जेव्हा तपास सुरु केला तेव्हा कुरुलकरांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप चाट आढळून आले . कुरुलकरांनी मागील वर्षभरात जिथे जिथे प्रवास केला होता तिथे ए टी एस ने तपास केला. या तपासत मुंबईतील कलिना इथल्या गेस्ट हाऊसमध्ये कुरुलकर वेगवेगळ्या सहा महिलांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं. या महिलांचा माग काढत एटीएसने त्यांची चौकशी केली असता त्यापैकी दोन महिलांनी कुरुलकरांनी लैंगिक शोषण केल्याचं एटीएसला सांगितलं आहे.
बाकी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या जाळ्यात कां नाही अडकले ? कुरुलकरच का अडकले ?
प्रदीप कुरुलकर झारा दास गुप्ता या बनावट नावाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून चालवल्या जाणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये अडकले. पण त्या आधी डीआरडीओचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी अनेकांना ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. डीआरडीओच्या वर्तुळात कुरुलकरांची एक रंगेल अधिकारी अशीच प्रतिमा तयार झाली होती. या सर्व गोष्टींची आणि कुरुलकरांच्या सवयींची माहिती काढून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेंनी कुरुलकरांना जाळ्यात अडकवायचं ठरवलं. इतर कोणता अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या जाळ्यात कां नाही अडकले ? कुरुलकरच का अडकले? याच उत्तर कुरुलकरांच्या या सवयींमध्ये दडलं आहे.
