पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये धर्म प्रसाराचा प्रकार समोर आला आहे. ख्रिश्चन समाजाच्या तीन महिलांवर धर्म परिवर्तन करत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. तर आम्हाला मारहाण करण्यात आली अशी परस्परविरोधी तक्रार या महिलांनी ही केली आहे.
त होत्या. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, बायबल वर विश्वास ठेवा, असं म्हणत त्या धर्म परिवर्तन करण्याचा ही प्रयत्न करत असल्याचा आरोप त्या कुटुंबाने या तिन्ही महिलांवर केला आहे. काल हा प्रकार समोर आल्यावर वाकड पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूट कामटे, पूजा कलाल, चांदणी राठोड अशी त्यांची नावं आहेत. या तिघी मोलमजुरी करतात आणि रिकाम्या वेळेत बायबल वाचून प्रबोधन करत असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. या तिन्ही महिलांनी ही त्यांना मारहाण केल्याची तक्रार केलेली आहे.
बळजबरीने घरात घुसायच्या अन् बायबल वाचायला लावायच्या…
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे हा सगळा प्रकार तीन महिला करत होत्या. त्या काही दिवसांपूर्वी रहाटणी परिसरातील एका कुटुंबाच्या घरी गेल्या आणि त्यांना बायबल वाचायला सांगितलं. त्यावेळी घरात असलेल्या महिलांनी त्यांना नकार दिला आणि घरातून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा या महिला घरात शिरल्या आणि त्या घरातील मुलांनादेखील वाचायला सांगितलं. त्यावेळी देखील त्यांनी बायबल वाचायला विरोध केला असता त्यांनी पुन्हा एकदा येशूचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या.
‘ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा , बायबलवर विश्वास ठेवा ‘
हा सगळा प्रकार वाढत असल्याचं पाहून अखेर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि हा सगळा प्रकार पोलिसांनी सांगितला. धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, बायबलवर विश्वास ठेवा, असं म्हणत धर्मांतर करायला लावण्याचे प्रकार आतापर्यंत अनेकदा समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी आळंदीतून असाच प्रकार समोर आला होता. येशूचं रक्त म्हणून दाक्षाचा रस काही नागरिकांना पाजण्यात आला होता. त्यावेळी कुटुंबियांनी या प्रकाराला विरोध केल्यावर त्यांना येशू माफ करणार नसल्याची धमकीदेखील देण्यात आली होती.
