आळेफाटा :

जळाऊ लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दि 28 ते 29 जून दरम्यान वडगाव आनंद हद्दीत राजेश भीमराव एकाडे रा राज पॅलेस टिळकरोड नगर यांच्या मालकीचा ट्रक क्र एम एच 16/बी सी/6111 हा ट्रक पावतीसह नगर येथून कल्याणकडे जात असताना राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ व रफिक पठाण व इतर दोन साथीदार रा राजुरी यांनी अडवून त्यांना मी वनविभागाचा अधिकारी असल्याची खोटी माहिती देऊन तुमची गाडी वनविभागाच्या कार्यालयात लावायची आहे व तुमच्या वाहनावर प्राथमिक वन गुन्हा प्रतिवृत्त पी ओ आर दाखल करतो अशी धमकी देऊन वैयक्तिक मोबाईल नं ९५०३३०३०८४ ह्या क्रमांकावर वनविभागाचा अधिकृत असलेला लोगोचा गैरवापर करून तुमची गाडी सोडवण्यासाठी मला पन्नास हजार रुपयाची लाच द्या, त्यानुसार सदर वरील मोबाईल क्रमांकावर फोन पे द्वारा ऑनलाईन दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन निघून गेले.

याबाबतची तक्रार वनविभाग जुन्नर यांच्याकडे प्राप्त झाल्याने तक्रारीची खात्री करून संतोष कृष्णाजी साळुंखे वय 45 वर्षे वनपाल जुन्नर यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे.गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ वय 43 वर्षे रा राजुरी यास गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आली आहे.गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस निरीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, सहाय्यक फौजदार सतीश टाव्हरे, पोलीस हवालदार विकास गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण लोहाेटे, भुजंग सुकाळे यांनी केली आहे.पुढील पुण्याचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास गोसावी करीत आहेत.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!