औरंगाबाद: 

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटला आहे. औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील   चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.  नामांतराला विरोध करण्यासाठी शहरात MIM चं आंदोलन सुरू आहे. संभाजीनगरमध्ये MIM च्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयएम आणि काही संघटनां कडून साखळी उपोषणाला सुरु करण्यात आले आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं या नामांतरा विरोधात हे उपोषण आहे. संभाजीनगर नाव आम्हाला मान्य नाही या शहराचं नाव औरंगाबाद रहावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. औरंगाबाद नाव बदलू नये यासाठी  औरंगजेबाचे फोटो झळकावल्याचा दावा करण्यात येत आहे. काही उपोषणकर्त्यांनी औरंगजेबांचे फोटो झळकावणाऱ्याला तिथून बाहेर काढले. मात्र यावर आता नवा वाद सुरू झाला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील  आंदोलनात सहभागी

जवळपास 500 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. नामांतरांला आमचा कायम विरोध असेल नामांतर आम्हाला मान्य नाही असं त्यांचं म्हणणे आहे. त्यासाठी या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. खासदार इम्तियाज जलील देखील उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!