पुणे:

रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. हे पत्र देऊन सुमारे 11 लाख रुपयांची फसवणूक  करण्यात आली. पोलिसांनी  हे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. रेल्वे मेल सर्व्हिस विभागाचे (आरएमएस) बनावट नियुक्तपत्र देऊन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) येथील आरएमएसमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. तसेच आणखी कोणी असेल तर त्यांनाही नोकरी देतो, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांचे नातेवाईक व इतरांना सांगितले. हा प्रकार 15 डिसेबर 2022 ते २ फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला आहे. या प्रकारात आरोपींनी फिर्यादीकडून दहा लाख ८१ हजार रुपये उकळले. त्यांना रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र दिले. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 465, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींना पकडले 

पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर आरोपींचा शोध सुरु केला. आरोपी योगेश संतराम माने व नीलेश संतराम माने (दोघे रा. ताडीवाला रोड, पुणे) हे दुचाकीसह रेल्वे पार्सल गेटसमोर थांबले आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्यांकडून मध्य रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र, बँक चेकबुक, इतर बनावट कागदपत्रे आणि रोख 99,500 रुपये जप्त करण्यात आले. पुढील तपास पीएसआय वाघमारे करीत आहेत.

यांनी केली कारवाई

कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, एसीपी (गुन्हे-१) सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात अमली पदार्थ विरोधी पथक-2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय शैलजा जानकर, सुजित वाडेकर, पांडुरंग पवार, प्रवीण उतेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, संदीप शिर्के, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेखीव काकडे यांचा समावेश आहे. योगेश मोहिते यांचा सहभाग होता.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!