पुणे:

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सन्नी पारखेला गंगापूर तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक केली आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावतीने इंस्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडियावर  पोस्ट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे 32 जणांची लिस्ट  सायबर क्राईम विभागाकडे देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांवर  गुन्हा दाखल करण्यात आहे.

याआधीही रुपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील मजकूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाजमाध्यमात अश्लील मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती.  फेसबूक कंपनीकडून संबंधित अकाऊंटची माहिती घेण्यात आली. फेसबूक कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे  पोलिसांनी वसंत खुळे (वय 34) याला परभणी जिल्ह्यातल रहाटी तालुक्यातून अटक केली. त्याचा फोन जप्त केला. त्याचा जबाब नोंदवून घेत त्याच्यावर नोटीसही देण्यात आली.

याशिवाय, फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर काही अश्लील कमेंट्सही कऱण्यात आल्या होत्या. पोलिसांनी हे अकाऊंट वापरणाऱ्याचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्यावरही कारवाई करत त्यालाही नोटीस बजावली होती.

दरम्यान, रुपाली चाकणकरांना विधानसपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटात जोरदार चर्चा सुरू आहे. रुपाली चाकणकर या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होत्या. त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.  त्यानंतर त्यांना विधानपरिषेदेची आमदारकी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!