पुणे :

पुण्यात  पोलिसांना  मारहाणीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर महामार्गावर लोणी टोल नाक्याजवळ गुरुवारी दुपारी  हा प्रकार घडला. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस शिपाई संदीप धुमाळ  31 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जणं रस्त्याच्या कडेला उभे राहून आरडाओरड करत होते. त्यावेळी पोलीस त्या परिसरात गस्त घालत होते. त्यांनी दोघांना आरडोओरड न करता घरी जायला सांगितलं. यावरुन पोलीस आणि त्या मुलांमध्ये वादावादी झाली. ही वादावादी टोकाला गेली आणि बाजूला असलेला दगड दोन जणांनी पोलिसांच्या डोक्यावर मारला. या मारहाणीत पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

विवेक किशोर साळुंखे (वय 20) आणि मयूर बबन आंबेकर (वय 28, दोघेही रा. मांजरी खुर्द) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी विवेक साळुंखे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी महिला पेलिसाला मारहाण
पुण्यात महिला पोलिसांला  मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अश्लील शिवीगाळ करुन महिला पोलिसाला चपलेने मारहाण करण्यात आली होता. माझी गाडी का उचलली, याचा जाब विचारत त्या महिला पोलिसाला जबर मारहाण करण्यात होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली होती. या प्रकरणी महिला पोलिसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आलं होतं. सीता रमेश पुजारी (वय 35 वर्षे, रा. ताडीवाला रोड) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली होती. अलका टॉकिज परिसरात हा प्रकार घडला होता. माझी गाडी का उचलली असा जाब त्या महिलेने पोलीस महिलेला विचारला होता. त्यावेळी पोलीस महिलेने माझी पोस्टिंग या परिसरात नाही त्यामुळे मला याबाबत माहिती नाही,” असं उत्तर दिलं होतं. यावरुन दोघींमध्ये वाद झाला आणि चपलेने मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!