अंबरनाथ  येथे अंदाधुंद गोळीबार  केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी  कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणातील 32 आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पंढरीनाथ फडके आणि नगरसेवक कुणाल पाटील  यांचाही समावेश आहे. यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. यानंतर या प्रकरणी पोलिसांमध्ये मोठा दबाव निर्माण केला जात आहे. पोलिसांनी एकतर्फी तपास करुन ही कारवाई केली असल्याचा आरोप पंढरीशेठ फडके  यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीसाठी मोठाय वाद झाला होता. यामधूनच 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यामध्ये हा वाद झाला. याच वादात अंदाधुंद गोळीबार देखील झाला होता. आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकूण 32 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि हत्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुणाल पाटील यांच्यावरही कारवाई

या प्रकरणामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली. कारण राहुल पाटील यांनी कुणाल पाटील यांच्याविरोधात त्यांनी मला राजकीय वादातून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर कुणाल पाटील आणि त्यांच्या दोन भावांवरही कारवाई करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय. मात्र पंढरीनाथ फडकेंसह 10 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पंढरीनाथ यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 10 जणांना शिवाजीनगर पोलिसांकडून अट करण्यात आली गोती. यापैकी पंढरीनाथ फडके आणि दोन जणआंना7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांवरील दबाव हा वाढला आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!