सरकारी नोकरीच्या  शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.  नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पोस्ट ऑफिसने  एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट विभागाकडून  विविध पदांवर मेगा भरती  राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान एकूण 98,083 जागा भरण्यात येणार आहे. जाणून घेऊया या भरतीविषयी सविस्तर माहिती.

भारत सरकाराचा उपक्रम असलेल्या पोस्ट विभागाचे जाळे देशभरात पसरले आहे. पोस्टची यंत्रणा भारत सरकार अंतर्गत राबवली जाते. त्यानुसार पोस्ट विभागात ही मेगा भरती राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पोस्टमन पदासाठी 59,099, मेलगार्ड पदासाठी 1445, मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून 37,539 पदांची भरती होणार आहे. देशातील 23 ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी 10 वी, 12 वी पास उमेदवार पात्र राहतील. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

एमटीएस पदासाठी- या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षे असावे. तर श्रेणी सवलतीनुसार-

एसटी/एससी- 38 वर्षे

ओबीसी- 35 वर्षे

ईडब्ल्युसी- एनए, पीडब्ल्युसाठी 10 वर्षे अधिक, ओबीसींसाठी 13 वर्षे अधिक

पीडब्ल्यु- एससी/एसटी 15 वर्षे अधिक

इतके मिळणार वेतन

या पदासाठी पात्र उमेदवाराला 33,718 ते 35,370 प्रति महिना वेतन मिळणार आहे. या पदांसाठी 100 रुपये परीक्षा फी असणार आहे. सर्व महिला, जातीय श्रेणी, ट्रान्स वूमन यांना फीमध्ये सुट मिळणार आहे. या पदांसाठी अर्ज तसेच अधिक माहितीसाठी www.indiapost.gov.in या संकेतस्थळाल भेट द्यावी.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!